२. मी चित्रकार कसा झालो!
ल. म. कडू — संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे आणि व्याकरण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
लेखक परिचय : ल. म. कडू (१९४७) — प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना २०१७ साली 'खारीचा वाटा' या पुस्तकासाठी 'साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार' मिळालेला आहे. प्रस्तुत पाठात निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून सांगितले आहे.
स्वाध्याय
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय :
- चित्रकला
- मूर्तिकला
(अ) मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय :
मूर्तीला तडे जाऊ नयेत म्हणून लेखकाने मातीत घोड्याची लीद (शेण) मिसळली. लीदीमध्ये असणाऱ्या धाग्यांमुळे माती धरून राहिली व मूर्तीला तडे जाण्याचे थांबले.
(आ) लेखकाचा कॅनव्हास :
नदीच्या काठावर पाण्याचा प्रवाहामुळे गुळगुळीत, सपाट झालेले आणि लांबरुंद पसरलेले जे मोठे खडक होते, तोच लेखकाचा कॅनव्हास होता.
(अ) लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष :
- अतिशय निसर्गरम्य
- सुसंस्कृत
(आ) लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक :
- घनदाट जंगलं
- दुथडी भरून वाहणारी नदी
- निळे डोंगर
- हिरवी रानं
Advertisement
| 'अ' गट | 'ब' गट (उत्तरे) |
|---|---|
| (१) पिवळा | (आ) दगडांपासून |
| (२) जांभळा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (३) भगवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
| (४) हिरवा | (अ) झाडांच्या पानापासून |
- (अ) बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा - ब्रश
- (आ) चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद - कॅनव्हास
- (इ) लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या - मूर्ती
- (ई) ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं - शेण
- (उ) घोड्याच्या शेणाला म्हणतात - लीद
जर आपल्या मनात एखादी कला शिकण्याची किंवा काम करण्याची तीव्र इच्छा असेल, तर साधनांची कमतरता आपल्याला अडवू शकत नाही. निसर्गात अनेक गोष्टी उपलब्ध असतात. लेखकाकडे कागद, रंग, ब्रश नव्हते, पण तरीही त्यांनी निसर्गातील खडकांचा कॅनव्हास म्हणून वापर केला. झाडांची पाने, फुले, बिया व दगड यांपासून रंग बनवले आणि बांबूच्या काडीचा ब्रश केला. यावरून असे समजते की, माणसाचा निश्चय ठाम असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत, उपलब्ध गोष्टींमधून मार्ग काढतो आणि आपले ध्येय साध्य करतो. इच्छा तिथे मार्ग मिळतोच.
खेळूया शब्दांशी
| विशेषण | नाम |
|---|---|
| निळे | डोंगर |
| हिरवी | राने |
| दाट | सावली |
आपण समजून घेऊया (व्याकरण)
| वाक्याचा प्रकार | नमुना वाक्य |
|---|---|
| (१) विधानार्थी वाक्य | मी दररोज वेळेवर शाळेत जातो. |
| (२) प्रश्नार्थी वाक्य | तुझे नाव काय आहे? |
| (३) उद्गारार्थी वाक्य | बापरे! केवढा मोठा साप हा! |
| (४) आज्ञार्थी वाक्य | मुलांनो, शांत बसा. |
माहितीसाठी : संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात — ज्याच्याविषयी सांगायचे ते 'उद्देश्य' आणि जे सांगायचे ते 'विधेय'.