इयत्ता ८ वी · मराठी

१३. संतवाणी

संत सेना महाराज आणि संत चोखामेळा यांचे अभंग | संपूर्ण स्वाध्याय, भावार्थ, शब्दार्थ आणि व्याकरण — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

★(अ) संत सेना महाराज — परिचय व भावार्थ

संत सेना महाराज : (इ. स. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध) हे संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे समकालीन संत होते. ते पंढरीचे वारकरी होते आणि त्यांच्या नावावर सुमारे १५० अभंग आढळतात. संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये केले आहे.

भावार्थ : संतभेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना संत सेना महाराज म्हणतात, "संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा (खूप भाग्याचा आणि आनंदाचा) झाला आहे. सासरी गेलेल्या मुलीला ज्याप्रमाणे माहेरी आल्यावर खूप आनंद होतो, तसाच आनंद माझ्या जीवाला आज झाला आहे. संतांचे चरण दृष्टीला पडल्याने माझा आयुष्यातील सगळा शीण (थकवा) नाहीसा झाला आहे आणि माझ्या घरी दसरा-दिवाळीसारख्या सणांचा उत्साह ओसंडून वाहत आहे."

शब्दअर्थ
आजिआज
सोनियाचासोन्याचा (अतिशय भाग्याचा)
देखिलेंपाहिले
अवघासंपूर्ण
निरसलादूर झाला, नाहीसा झाला
शीणथकवा
★(आ) संत चोखामेळा — परिचय व भावार्थ

संत चोखामेळा : प्रसिद्ध संतकवी. त्यांच्या अभंगांतून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते, तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केले आहे.

भावार्थ : संत चोखामेळा म्हणतात, "ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी आणि इतर लहान-मोठी झुडपे आली, तर तीदेखील चंदनाप्रमाणे सुगंधित होतात, त्याचप्रमाणे संतांच्या सहवासात आलेले अभाविक लोकही भाविक (भक्त) बनतात. म्हणूनच मनुष्य जन्माला येऊन परमार्थ (ईश्वरभक्ती आणि सत्संग) साधावा, नाहीतर आपले हे जीवन भूमीला केवळ एक भार (ओझे) ठरेल."

शब्दअर्थ
संगेंसोबत, सहवासात
दर्शनेंदर्शनाने
हेकळीवाकडी
टाकळीलहान झुडूप
अभाविकभाविक नसलेले (भक्ती नसलेले)
खरगाढव

Advertisement

१दिलेल्या आकृतीतील नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

दिलेले शब्द :
नाम : व्यक्ती, वस्तू, लाडू, चेंडू, मिठाई, भाजी, तुषार.
सर्वनाम : तो, ती, हा, ही, त्या.
विशेषण : रंगीत, गोड, हिरवी, मोठा, गुणी, पिवळा, ताजी, सुंदर, खेळकर.
क्रियापद : देणे, ओळखणे, खेळणे, खाणे, पाहणे, आवडणे, करणे, आहे, पळणे, घेणे.

तयार केलेली अर्थपूर्ण वाक्ये :

  • १. तुषार गुणी आहे.
  • २. तो पिवळ्या चेंडूने खेळतो.
  • ३. तुषारला मिठाई आवडते.
  • ४. ही हिरवी भाजी ताजी आहे.
  • ५. ती व्यक्ती खूप सुंदर आहे.
  • ६. हा मोठा लाडू गोड आहे.
  • ७. त्या गुणी मुलाला चेंडू खेळणे आवडते.
  • ८. तो खेळकर मुलगा पळत आहे.
  • ९. ही रंगीत वस्तू मला आवडते.
२हे नेहमी लक्षात ठेवा : घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

दिलेल्या सूचना :
• जीव धोक्यात घालू नका, दरीत डोकावून पाहू नका.
• भर रस्त्यात गाडी थांबवू नका, इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका.

सूचनाफलक — घाट ओलांडताना घ्यायची काळजी

  • १. अतिघाई संकटात नेई! घाटात वाहनाचा वेग मर्यादित ठेवा.
  • २. वळणावर गाडी ओव्हरटेक (Over-take) करू नका.
  • ३. दरीत डोकावून पाहू नका, जीव धोक्यात घालू नका.
  • ४. भर रस्त्यात गाडी थांबवू नका, वाहतुकीस व्यत्यय आणू नका.
  • ५. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना डिपरचा (Dipper) वापर करा.
  • ६. निसर्गाचा आनंद घ्या, पण घाटात कचरा टाकू नका.